वैजापूरच्या नगर पालिकेचे दुर्लक्ष
वैजापूर, (प्रतिनिधी): काही महिन्यांपूर्वी वैजापूर नगरपालिकेसह वैजापूर पोलिसांनी अवैधपणे बॅनर लावणाऱ्या लोकांवर कारवाई
करण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. त्यासाठी वैजापूर शहरात काही जागाही सुचित केल्या होत्या. कुठल्याही प्रकारचे
बॅनर लावायचे असल्यास प्रथम वैजापूर नगरपालिकेकडून परवानगी घेऊनच बॅनर लावावे असा नियम केला होता.
काही दिवस लोकांनी परवानगी घेतल्या. प्रत्येक बॅनरवर परवानगीच्या कागदाचा फोटो सुद्धा टाकण्याचा नियम होता. परंतु थोड्याच दिवसांमध्ये पुन्हा जैसे थे परिस्थिती झाली. पालिकेने सुचित केलेल्या जागा सोडून कुठेही सर्रासपणे बॅनर लावले जात आहेत. परवानगी शुल्कामुळे पालिकेलाही आर्थिक लाभ मिळत होता. पालिकेच्या दुर्लक्षामुळे पालिकेच्या आर्थिक तिजोरीलाही फटका बसत आहे.